सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानुसार समलैंगिकता हा एकप्रकारचा गुन्हा आहे. मात्र, हा वादाचा मुद्दा आहे. पण बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक दिग्दर्शकांनी समलैंगिक संबंध मोठ्या पडद्यावर सादर केले आहे. जाणून घेऊया या चित्रपटांविषयी..
१. करण जोहरने आपल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटामध्ये समलैंगिक संबंध दाखवले होते. यामध्ये अभिषेक बच्चन आणि जॉन इब्राहिम यांच्यामधील प्रेमसंबंध अतिशय विनोदी शैलीत सादर करण्यात आले होते.
२. भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहर निर्मित ‘बॉम्बे टॉकिज’ चित्रपटातील एका कथेत दोन पुरुषांमध्ये समलैंगिक संबंध दाखवण्यात आले आहेत. रणदीप हुडा आणि साकिब सलीम यांनी या भूमिका साकरल्या होत्या.
३. करणच्याच ‘कल हो ना हो’मध्ये सैफ अली खानच्या मोलकरणीला शाहरुख आणि सैफने साकारलेल्या भूमिकांमध्ये समलिंगी संबंध असल्याचे वाटत असते. अर्थात या भूमिका गमतीदार पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या.
४. २०१०मध्ये संजय शर्माने दिग्दर्शित केलेल्या ‘डोन्ट नो वाय…ना जाने क्यों’ ही फिल्म एका समलैंगिक मॉडेलच्या जीवनावर आधारित होती. यामध्ये करिअरसाठी एका मॉडेलला आपल्या नैतिकतेशी सौदा करण्यासाठी असहाय्य व्हावे लागते.
५. समलैंगिक संबंधांवर बनलेल्या चित्रपटांमध्ये जास्त चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘गर्लफ्रेण्ड’. या चित्रपटात दोन स्त्रियांमधील समलैंगिक संबंध दाखवण्यात आले होते. इशा कोपीकर आणि अमृता अरोराने समलैंगिक जोडप्याची भूमिका साकारुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
६. मधुर भंडाकरने ‘पेज ३’ आणि ‘फॅशन’ या चित्रपटांमध्ये समलैंगिकतेचा मुद्द्या हाताळला होता.
७. निर्माता ओनीरनेही आपल्या ‘आय एम’ आणि ‘माय ब्रदर निखिल’ या चित्रपटांनी समलैंगिकतेच्या मुद्दयाला स्पर्श केला होता.
८. दीपा मेहताच्या ‘फायर’ चित्रपटात वैवाहिक आयुष्यात निराश झालेल्या दोन महिलांमध्ये प्रेमसंबंध दाखवण्यात आले होते. शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी या भूमिका साकारल्या होत्या.

Story img Loader