बॉलिवूडचा लोकप्रिय गायक हनी सिंगने कुटुंबीय आणि जवळच्या काही मित्रांसमवेत  आपला ३२ वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. जॅझी बी आणि अलफाज हेदेखिल वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला उपस्थित होते. जॅझीबरोबरचे आपले एक छायाचित्र हनी सिंगने टि्वटरवर पोस्ट केले आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी आणि बहिणदेखील आहे.

गेले अनेक दिवस प्रसारमाध्यमांपासून दूर असलेल्या हनी सिंगला त्याच्या असंख्य चाहत्यांनी टि्वटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देत हनी सिंगनेदेखील टि्वटरच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले.

अलिकडेच हनीने ‘दिल्लीवाली जालीम गर्लफ्रेण्ड’ चित्रपटातील ‘बर्थडे बॅश’ गाण्याद्वारे धमाकेदार पुनरागमन केले आहे.

Story img Loader