लवकरच प्रसिद्ध रॅप गायक हनी सिंगचा ‘इंडियाज रॉक स्टार’ नामक रियालिटी शो टीव्हीवर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या शोच्या पहिल्या भागाच्या चित्रीकरणादरम्यान गायक हनी सिंगला दुखापत झाल्याचे समजते. पहिल्या भागाच्या शेवटच्या सत्राचे चित्रीकरण सुरू असताना अचानक हनी सिंग घसरून पडल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेत त्याला थोडे फार खरचटले. आपल्या उत्साहात कुठलीही कमतरता न आणता आणि आढेवेढे न घेता लगेच उठून उभे राहात त्याने पुन्हा चित्रीकरणास सुरूवात केल्याचेदेखील उपस्थितांकडून समजले. ‘इंडियाज रॉक स्टार’ कार्यक्रमात हनी सिंग स्पर्धकांचा मित्र आणि मार्गदर्शक अशी दुहेरी भूमिका साकारत आहे. ‘इंडियाज् रॉक स्टार’चा किताब हस्तगत करण्यासाठी संपूर्ण भारतातून स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाला स्टार प्लसवर येत्या रविवारपासून सुरुवात होते आहे. मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान ही या कार्यक्रमाची सूत्रसंचालक आहे.

Story img Loader