रॅप संगीत गायक ‘हनी सिंग’च्या गाण्यांचा व्हिडीओ यूट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या आता एक लाखाच्या वर गेली आहे. यूट्यूबवर हनी सिंगच्या सर्व नव्या गाण्यांचे आणि लाईव्ह स्टेज परफॉरमन्सचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. ‘ब्राऊन रंग’, ‘हाय हिल्स’ आणि ‘सतन’ या रॅप गीतांसाठी प्रसिद्ध असलेला हनी सिंग यूट्यूबवरील आपल्या चाहत्यांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल म्हणाला की, “माझ्या चाहत्यांनी माझ्या गाण्यांना दिलेला प्रतिसाद, मला आणखी जोमाने काम करण्यास प्रवृत्त करतो, मला त्यातून प्रोत्साहन मिळते. तसेच माझ्या गाण्यांना जागतिक स्तरावर प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहचविण्यात यूट्यूब माध्यम महत्वाची भूमिका पार पाडत आहे आणि यामाध्यमाच्या मदतीने जग भरातील संगीत रसिकांच्या प्रतिक्रियाही अगदी सहजरित्या आमच्यापर्यंत पोहोचतात. याप्रतिक्रियांचा अभ्यास करून पुढील गाण्यांसाठी अधिक चांगल्यारितीने काम करण्यास मदत होईल.”
मागील वर्षी हनी सिंगच्या ‘ब्राऊन रंग’ गाण्याचा व्हिडीओ ‘यूट्यूब इंडीया’वर अव्वल स्थानावर होता.

Story img Loader