ऑस्कर विजेता चित्रपट ‘पॅरासाइट’मधील दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता ली-सून-क्यून (वय ४८) सोल येथे एका कारमध्ये ली-सून-क्यून बुधवारी मृतावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आता एका ४७ वर्षीय अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. लाई सुक यिन असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाँगकाँगची लोकप्रिय अभिनेत्री लाई सुक यिन हिने २६ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार ती तिच्या मुलाजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. लाइ सुक यिनने राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला. अभिनेत्रीला तातडीने रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

‘या’ अभिनेत्रीने करिअरमध्ये केले फक्त ७ सिनेमे; सुपरस्टारशी लग्न, मुलीचा जन्म अन् ९ वर्षांनी घेतलेला जगाचा निरोप

लाइ सुक यिनच्या कुटुंबाला अभिनेत्रीच्या निधनाने धक्का बसला आहे. तिच्या कुटुंबियांच्या मते, तिने एक दिवस आधी सर्वांसोबत ख्रिसमस साजरा केला होता. ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोही तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यामध्ये तिचा पती आणि दोन मुलंही तिच्याबरोबर दिसत होती. याशिवाय लाइ सुक यिनने तिच्या पाळीव श्वानाबरोबरचा ख्रिसमसच्या जेवणाचा फोटोही शेअर केला होता.

Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित

लाइ सुक यिनने १९९५ मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. मिस एशिया ब्युटी पेजंटमध्ये ती रनर अप होती. नंतर तिने ‘व्हॅम्पायर एक्सपर्ट २’ आणि ‘यंग अँड डेंजरस ३’ मध्ये काम केलं होतं. १९९६ पर्यंत तिने आपल्या अभिनयामुळे खूप लोकप्रियता मिळवली. यानंतर १९९८ मध्ये लाई सुक यिनने लग्न केलं होतं. तिने हाँगकाँगमधील अभिनेता लो याच्याशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं झाली पण २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने २००७ मध्ये कॉस्मेटिक सर्जन अँगस हुईशी लग्न केलं. या दोघांनाही दोन मुलं आहेत.