सलमानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्हयाअंतर्गत जास्त काळ कारावास भोगावा लागू नये, अशी आशा बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरने व्यक्त केली आहे. हिट अॅण्ड रन प्रकरणात सलमानला १० वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
स्थानिक न्यायालयाने सलमानविरुद्ध निश्चित केलेल्या आरोपांबाबत विचारले असता अनिल कपूर म्हणाला की, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे याप्रकारचा कोणताही अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. १० वर्षांचा कारावास भोगावा न लागण्याची मला आशा असून माझे मन मला सांगते की सलमानला शिक्षा होणार नाही. अनिल कपूर आणि सलमान हे दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांनी ‘दीवाना-मस्ताना’, ‘बिवी नं.१’, ‘नो एंन्ट्री’, ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘युवराज’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hope salman khan doesnt have to serve jail term anil kapoor