सर्वाधिक रेकॉर्डेड गाणी गाण्याचा विश्वविक्रम ज्यांच्या नावावर आहे, त्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले येत्या मंगळवारी ८३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आशाताईंच्या प्रदीर्घ आणि विविधरंगी कारकीर्दीचा आढावा घेण्यासाठी शेमारु कंपनीने ‘१०१ आशा भोसले हीट्स’ हा तीन डीव्हीडीजचा संच त्यांच्या चाहत्यांसाठी सादर केला आहे. या वयातही उत्साहाने स्टेज शो करणाऱ्या आशाताईंनी अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी या संचाचे प्रकाशन केले. यातील ‘अनकही’, ‘चरित्रहीन’, ‘बंदिनी’ या चित्रपटांतील गीतांमुळे अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या डीव्हीडीतील विविध मूडमधील गाण्यांमुळे आशाताईंचे अष्टपैलुत्व नव्याने अधोरेखित झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा