रियालिटी शो ‘बिग बॉस’ला लवकरच मोठ्या पडद्यावर येण्याचा वाव मिळणार आहे. या लोकप्रिय टीवी कार्यक्रमावर हॉरर चित्रपट बनत आहे.
‘इन्डेमॉल इंडिया’ आणि ‘सिलेक्ट मिडिया होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड’ची चित्रपट निर्मिती शाखा ‘मुव्हिंग पिक्चर्स’ हे संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट ‘बिग बॉस’च्या घरात राहणा-यांच्या अनुभवांवर आधारित असेल.
सध्या चित्रपटाच्या पटकथेचे काम सुरू असून प्रत्यक्ष चित्रिकरणाला २०१३ ला सुरूवात होईल. चित्रपटातील कलाकारांची निवड अंतिम टप्प्यात होणार असून प्रेक्षकांना यात छोट्या पडद्यापासून ते रुपेरी पडद्यावरील तारे-तारकांचे दर्शन होईल.
‘इंन्डेमॉल इंडिया’ चे सीईओ दीपक धर म्हणाले, “बिग बॉस हा सेलिब्रिटी रियालिटी शो खूपच यशस्वी राहिला आहे आणि हा रियालीटी शो लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. या शोचे सर्वात मोठे यश म्हणजे याने सर्व वयोमानाच्या लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे.”
बिग बॉसचे सध्याचे सहावे पर्व सुरू असून बॉलीवूड स्टार सलमान खान याचा होस्ट आहे.

Story img Loader