दिवाळी, बिग बजेट चित्रपटांचे प्रदर्शन, त्यासाठीचे प्रसिध्दीकार्यक्रम, ठिकठिकाणचे दौरे, प्रिमिअर शो असा सगळा माहौल तापला असताना त्यासाठी तयारी करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना सध्या जुनाच ‘ताप’ नव्याने सतावतोय. बॉलिवूड ब्रिगेडमधले आघाडीचे कलाकार एकापाठोपाठ एक करत तापाने आजारी पडत आहेत. कतरिना कैफ, शाहरूख खान, सलमान खान, रणवीर सिंग, वीर दास, सोहा अली खान आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ‘क्रिश ३’च्या प्रसिध्दी कार्यक्रमात व्यग्र असलेल्या प्रियांकालाही तापाने पछाडले आहे. दुर्गापूर येथे ‘राम लीला’ चित्रपटाचे चित्रिकरण करत असतानाच अभिनेता रणवीर कपूरला डेंग्यूने गाठले होते. तेव्हा त्याने तापाकडे दुर्लक्ष केले. पण, चित्रिकरण संपवून मुंबईत परतलेल्या रणवीरची थेट रवानगी झाली ती लिलावती रुग्णालयात. रणवीर रुग्णालयातून बाहेर पडला असला तरी पूर्णपणे बरा झालेला नाही. रणवीरपाठोपाठ आणखी एकाला डेंग्यूने गाठले आहे. ‘दिल्ली बेल्ली’ फेम अभिनेता वीर दास यालाही डेंग्यू झाला असून त्यामुळे त्याच्या ‘सुपर से उपर’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीवर परिणाम झाला आहे. या दोघांबरोबरच कतरिना कै फलाही ‘धूम ३’ च्या प्रसिध्दीसाठी बाहेर पडणे अशक्य झाले आहे. गेले काही दिवस कतरिना सातत्याने आजारी आहे. ‘धूम ३’ चे चित्रिकरण संपल्यानंतर कतरिना केवळ आणि केवळ उच्च क्षमतेच्या औषधांवर आहे. पण, या औषधांचे परिणाम तिच्या चेहऱ्यावर दिसू लागल्याने तिला पुढचे काही दिवस कॅ मेऱ्यासमोर येता येणार नाही. त्यामुळे सध्या कतरिनाने स्वत:ला कोषात बंदिस्त करून घेतले आहे. ‘चेन्नई एक्सप्रेस’साठी वेगाने इकडेतिकडे फिरून फिरून दमलेल्या शाहरूखने भलेही चांगली कमाई केली असेल. पण, सततच्या कामामुळे आणि आता तापामुळे त्याच्या एक्स्प्रेसला ब्रेक घ्यावा लागला आहे. ‘दबंग’ सलमान खानही या तापामुळे आडवा झाला आहे. एकीक डे त्याचे दुखणेही बळावले असून त्यात तापाची भर पडल्यामुळे तो हवालदिल झाला आहे. वरची यादी बघितली तर ज्यांचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत किंवा प्रसिध्दी कार्यक्रमासाठी त्यांना फिरायचे आहे अशा मोठमोठय़ा कलाकारांना या तापाने सतावले आहे. अगदी खोटं वाटत असेल तर या यादीत नव्या नावाची भर पडली आहे ती प्रियांका चोप्राची. ‘क्रिश ३’ च्या प्रसिद्धीसाठी प्रियांका दिल्लीत पोहोचली पण, तापाने फणफणलेल्या प्रियांकाला अखेर डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आणि आराम करण्याचा सल्ला दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा