बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जरीन तिच्या आगामी पंजाबी चित्रपटाच्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने पंजाबमध्ये गेली होती. तेथून परतल्यानंतर तिने कुटुंबीयांसह हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तत्काळ तिला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिला अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. झरीन ‘पार्टनर २’ या चित्रपटातही काम करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा