अभिनेता अक्षय कुमारने स्वत: ट्विटरद्वारे बहुप्रतिक्षित ‘हाऊसफुल ३’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले. चित्रपटाच्या पोस्टरने सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का दिला आहे. जॅकलिन फर्नांडिस, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नर्गिस फाखरी आणि लिसा हेडन अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सगळ्या कलाकारांनी निळ्या रंगाचा वेश परिधान केला आहे. अभिषेक बच्चन, नर्गिस फाखरी आणि लिसा हेडन हे कलाकार ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटात पहिल्यादांच दिसणार आहेत.
‘हाऊसफुल ३’ हा चित्रपट फरहाद-साजिद याने दिग्दर्शित केला असून साजिद नाडियादवला आणि इरॉस इंटरनॅशनल यांनी निर्मित केला आहे. हा चित्रपट ३ जून, २०१६ रोजी प्रदर्शित होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housefull 3 poster akshay kumar and the cast appear in shades of blues