६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ या चित्रपटाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक या पुरस्कारांसोबतच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड म्युझिक आणि सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन असे दोन पुरस्कारही मिळाले. हा चित्रपट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र असं असतानाही या चित्रपटाला २०१८ चा राष्ट्रीय पुरस्कारासाठी मानांकन कसं काय मिळालं? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मुद्द्यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र एका खास कारणामुळे या चित्रपटाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र ‘उरी: द सर्जिकल स्टाइक’ या २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचाही पुरस्कारांमध्ये समावेश करण्यात आला. ‘उरी’ हा चित्रपट जरी ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असला,तरी त्याला ३१ डिसेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत मानांकन मिळवण्यासाठीचं प्रमाणपत्र मिळालं होतं. त्यामुळे या चित्रपटाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

कोणत्याही चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत मानांकन मिळविण्यासाठी १ जानेवारीच्या आधी म्हणजे ३१ डिसेंबरला प्रमाणपत्र मिळणं आवश्यक असतं. विशेष म्हणजे ‘उरी’ला हे सर्टिफिकेट ३१ डिसेंबर रोजीच मिळालं होतं.

दरम्यान, ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकला असून या चित्रपटासाठी विकीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे विकीने हा पुरस्कार आई-वडील आणि देशातील सैनिकांना समर्पित केला आहे.