भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेता इम्रान हाश्मी अझरच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, अझरसारखे दिसण्यासाठी इम्रानला स्वत:मध्ये अनेक बदल करावे लागले. मैदानावरील दृश्यांमध्ये अझरइतके उंच दिसण्यासाठी इम्रान तब्बल चार इंचाचा सोल असलेले बुट घालायचा. माझी उंची ५ फूट ८ इंच इतकी आहे तर अझरची उंची ६ फुट १ इंच होती. त्यामुळे मला मैदानावरील चित्रीकरणादरम्यान जास्त उंचीचे बुट घालूनच खेळावे लागत असल्याचे इम्रानने सांगितले.
अझरची चालण्याची शैली आत्मसात करणे माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी मी अनेक व्हिडिओ पाहून अझरच्या चालण्याच्या आणि शारीरिक हालचालींचे निरीक्षण केले. अझर चालताना उजवा खांदा आणि डोके थोडेसे झुकवत असे. तो चालताना क्वचितच वर बघत असे. मला या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याची सवय होण्यासाठी काही कालावधी गेल्याचे इम्रानने म्हटले. याशिवाय, या चित्रपटात माझी चेहरेपट्टी अझरसारखी दिसणे ही खूप महत्त्वाची बाब होती. त्यासाठी सुरूवातीला प्रोथेस्टीक मेकअपचा वापर करण्याचा पर्याय वापरण्याचे ठरले होते. मी त्यासाठी लंडनलाही जाऊन आलो होतो. माझे नाक आणि चेहऱ्याचा अन्य भाग अझरसारखे दिसावे, यासाठी डिझाईनदेखील तयार करण्यात आले होते. मात्र, आम्ही हैदराबादमधील उष्ण वातावरणात चित्रीकरण करणार असल्याने हा बेत बारगळला. यानंतर मी अझरसारखा दिसण्यासाठी माझ्या केशरचनेत बदल करण्यात आले, असे इम्रानने सांगितले. तसेच अझरचे खान इम्रानपेक्षा मोठे असल्याने चित्रीकरण करताना माझ्या कानामागे क्लिप्स लावायला लागत, असेही इम्रान हाश्मीने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा