हॉलिवूडमधला टॉप सुपरस्टार टॉम क्रूजचा नुकताच ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. २०२२ साली ‘टॉप गन: मेवरिक’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर टॉम क्रूजचा १२ जुलैला संपूर्ण जगभरात ‘मिशन इम्पॉसिबल 7’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे संपूर्ण नाव ‘मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन’ असं आहे. सध्या या चित्रपटासाठी टॉम क्रूजने घेतलेल्या मानधनाची चर्चा जोरदार सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपटात टॉमनं जबरदस्त स्टंटबाजी केली आहे. आतापर्यंतचा सर्वात खतरनाक स्टंट या चित्रपटात केल्याचं त्यानं सांगितले. व्हरायटीच्या (Variety) वृत्तानुसार, ‘मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन’ हा चित्रपट बनवण्यासाठी २९० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास दोन हजार ३८५ कोटींचा खर्च झाला आहे. हा खर्च निर्मात्यांनी विचार केलेल्या खर्चापेक्षा १० पट जास्त आहे. यापूर्वीच्या २०१८ साली प्रदर्शित झलेल्या ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ या चित्रपटाला १९० मिलियन डॉलर म्हणजे एक हजार ५६२ कोटींचा खर्च आला होता.

हेही वाचा – ‘सतीची पुण्याई’ चित्रपटातील ‘तो’ सीन करणं रवींद्र महाजनींच्या बेतलं होतं जीवावर; नेमकं काय घडलं?

हेही वाचा – “कित्येक रात्री डोळ्यात पाणी अन् मनात असंख्य विचार….” केदार शिंदेंची पत्नी व मुलीविषयी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

टॉम क्रूजच्या मानधनाविषयी बोलायचं झालं तर, आतापर्यंत मिशन इम्पॉसिबलच्या फ्रेंचाइजीमधून त्यानं १०० मिलियन डॉलर म्हणजेच ८२२ कोटींची कमाई केला आहे. तसेच आता त्यानं ‘मिशन इम्पॉसिबल 7’साठी १२ ते १४ मिलियन डॉलर म्हणजे ९८ ते ११५ कोटींचं मानधन घेतलं आहे. शिवाय अभिनेता टॉम क्रूज बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या कमाईमधलाही हिस्सा घेणार आहे. कारण या चित्रपटाचा टॉम क्रूज निर्माताही आहे. जस्ट जेरेडच्या वृत्तानुसार, अभिनेत्याचं एकूण नेट वर्थ ६०० मिलियन डॉलर म्हणजे चार हजार ९४४ कोटी इतकं आहे.

हेही वाचा – घोरपड, साप हातात घेऊन मिसेस उपमुख्यमंत्री सांगतायत कोणता प्राणी सर्वात विषारी?; नेटकरी म्हणाले, “घरातच…”

‘मिशन इम्पॉसिबल 7’ प्रदर्शित होताच त्याने भारतामध्ये पहिल्याच दिवशी १२.५ कोटींची, तर दुसऱ्या दिवशी नऊ कोटींची कमाई केली. तसेच तिसऱ्याही दिवशी कमाईचा आकडा सारखाच राहिला आहे. त्यामुळे या चित्रपटानं आतापर्यंत एकूण ३०.३० कोटींचा गल्ला जमवला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much crore tom cruise charge for mission impossible 7 pps
Show comments