गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनी चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीच पडली होती. सध्या ती ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे प्रचंड चर्चेत आहे. यात तिच्या डान्सचे प्रचंड कौतुक केले जात आहे. नुकतंच या आयटम साँगसाठी तिने कोट्यावधी रुपयांचे मानधन आकारल्याची चर्चा रंगली होती. यानंतर आता त्याचा खरा आकडा समोर आला आहे.

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

Govinda
३ दिवस ७५ लोकांच्या युनिटने गोविंदाची स्वित्झर्लंडमध्ये शूटिंगसाठी पाहिलेली वाट; प्रसिद्ध दिग्दर्शक खुलासा करत म्हणालेले, “३ दिवसानंतर…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
amaltash movie
सरले सारे तरीही…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Rohit Roy talks about diet
२५ दिवसांत १६ किलो वजन घटवलं अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “मी अत्यंत मूर्खासारखा…”
Pritish Nandy Death
Pritish Nandy : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि लेखक प्रीतीश नंदी यांचं निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Buldhana, Cinestyle chase, money looted,
बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…

‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे समांथाने पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. या गाण्यात ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे. या गाण्यासाठी समांथाने मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ हे गाणे केवळ ३ मिनिटांचे आहे. या आयटम साँगसाठी समांथाने १ किंवा २ कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर येत होती. मात्र या गाण्यासाठी तिने ५ कोटी रुपये मानधन आकरले आहे.

‘पुष्पा’ चित्रपटातील समांथाच्या ‘त्या’ आयटम साँगमधील पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली…

विशेष म्हणजे समांथाने या गाण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. पण अल्लू अर्जुनने तिला हे आयटम साँग करण्यासाठी विनंती केली होती. या विनंतीनंतरच तिने या गाण्याला होकार दर्शवला होता. दरम्यान या गाण्यात काही स्टेप्स करताना तिला अडचणी येत होता. पण त्यानंतर तिने सराव करत उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. यात तिच्या डान्सचे प्रचंड कौतुक केले जात आहे.

Story img Loader