कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. अँड द ऑस्कर गोज टू…हे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले आहेत. ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी सोनेरी रंगाची असते. त्यामुळे तिला सोनेरी बाहुली असेही ओळखले जाते. ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. मात्र ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी खरच सोन्याची असते का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तसेच ऑस्करच्या त्या ट्रॉफीची किंमत नेमकी किती असते? त्याचा फायदा काय होतो? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

ऑस्कर पुरस्कार मिळण्याचा फायदा काय?

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
laapataa ladies
Oscars साठी किरण रावने ‘लापता लेडीज’चं नाव बदललं! काय आहे नवीन नाव? चित्रपटाचं पोस्टर आलं समोर
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

एका रिपोर्टनुसार, ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या विजेत्या कलाकारांचे मानधन तीन ते चार पटीने वाढते. त्यांच्या मानधनात जवळपास ८१ टक्क्यांनी वाढ होते. पण एखाद्या अभिनेत्याच्या मानधनातच इतक्या टक्क्यांनी वाढ होते. अभिनेत्रींच्या मानधनात त्या तुलनेत कमी वाढ होते.

Oscar 2022 : पहिला ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या भारतीय महिलेचे नाव माहितीये का?

ऑस्करची ती सोनेरी बाहुली खरंच सोन्याची असते का?

ऑस्कर पुरस्कारात मिळणारी सोनेरी बाहुली म्हणजे ट्रॉफी ही सोन्याची असते का? असा प्रश्न पडलेला असतो. मात्र ऑस्करची ती ट्रॉफी तांब्याची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावला जातो. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, धातूच्या कमतरतेमुळे तीन वर्ष ऑस्कर ट्रॉफी रंग लावलेल्या प्लॅस्टरमध्ये तयार करण्यात आली.

ऑस्कर ट्रॉफीची किंमत नेमकी किती?

ऑस्कर पुरस्कारावर दरवर्षी अब्जावधी रुपये खर्च केले जातात. या ट्रॉफीची किंमत त्यावेळीच्या तांबे आणि सोन्याच्या किंमतीवर अवलंबून असते. तर दरवर्षी या एका ट्रॉफीची निर्मिती करण्यासाठी ४०० डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास ३१ हजार रुपये खर्च येतो.

Oscars 2022 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ऑस्कर पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या

ऑस्कर विजेत्यांना ही ट्रॉफी विकता येते का?

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नियमानुसार, कोणत्याही विजेत्याचा ऑस्कर ट्रॉफीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो. त्यामुळे विजेत्याची इच्छा असली तरी तो ही ऑस्कर ट्रॉफी विकू शकत नाही. जर विजेत्याला ती ट्रॉफी विकायची असेल तर त्याला सर्वात आधी ती अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सला विकावी लागते. विशेष म्हणजे ही अकादमी फक्त १ डॉलरला ऑस्कर ट्रॉफी विकत घेते.

ऑस्करमधील एण्ट्रीवर किती रक्कम खर्च केली जाते?

मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्करमध्ये एखाद्या चित्रपटात एण्ट्री मिळवण्यासाठी ३० लाखांपासून कोट्यवधींपर्यंतचा खर्च येऊ शकतो. चित्रपटाच्या एण्ट्रीनंतरही अनेक ठिकाणी पैसा खर्च करावा लागतो. त्या चित्रपटाचे प्रमोशन करणे, चित्रपट पाहण्यासाठी लोकांना पटवून देणे, यांसह विविध बाबीसाठी कोट्यवधींचा खर्च येतो.