बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाला ३५ वर्षे पूर्ण झाली. या ‘ऑल टाईम हीट’ जोडीने नुकतेच अभिनेते अनुपम खेर यांच्या टेलिव्हिजन कार्यक्रमात उपस्थिती लावली. कार्यक्रमात दोघांनीही त्यांच्या जीवन प्रवासातील विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला. ऋषि कपूर यांनी आपल्या प्रेमकहाणीचे गुपीत देखील सांगितले. आपल्या प्रेमकाहाणीच्या आठवणींना उजाळा देताना ऋषि कपूर यांनी ‘जेहरीला इन्सान’ या ७० च्या दशकातील चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीच्या काही घटना ताज्या केल्या. नितूशी झालेली भेट, भेटीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झालेले रुपांतर हा संपूर्ण प्रवास ऋषि कपूर यांनी कार्यक्रमात सविस्तर उलघडून सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मला आठवते त्यावेळी माझे माझ्या प्रेयसीसोबत भांडण झालं होतं. मी भरपूर दु:खी होतो. तिला पुन्हा मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी नीतू मला माझ्या प्रेयसीला पत्र लिहीण्यासाठी मदत देखील करत होती. तेव्हा मी आणि नीतू  ‘जेहरीला इन्सान’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने एकत्र होतो. पण, नंतर जस जसा वेळ पुढे गेला मी नीतूला मिस करत असल्याची जाणीव होऊ लागली. युरोपमध्ये चित्रीकरणात व्यस्त असताना नीतूच्या आठवणीने मी तिला तेथून पत्र लिहीले. ‘मला तूझी आठवण येतेय’ एवढंच पत्रात लिहीलं होतं आणि या पत्रापासूनच आमच्या प्रेमकहाणीचा पहिला अध्याय सुरू झाला, असं ऋषि कपूर यांनी खेर यांच्या ‘दी अनुपम खेर शो- कुछ भी हो सकता है’ या कार्यक्रमात सांगितलं. हा कार्यक्रम येत्या रविवारी प्रदर्शित होणार आहे.