हृदयनाथ मंगेशकर यांची मुलगी राधा मंगेशकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आवाजाची आत्यांशी झालेली तुलना आणि त्यानंतर झालेली टीका याबद्दल भाष्य केलं. इतकंच नाही तर लोकांनी मंगेशकर कुटुंबावर प्रेम केलं, व्यक्ती म्हणून माझ्यावर नाही, असं विधानही राधा यांनी केलं. राधा यांनी तत्त्वज्ञानामध्ये पीएचडीचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित ‘एकटीचा सफरनामा’ नावाचं पुस्तकही लिहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलसाठी त्यांची सौमित्र पोटे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी मंगेशकर कुटुंबाचा भाग असूनही नकार पचवावे लागले, लोकांनी अगदी वाईट टीका केली असं सांगितलं. “लोकांनी माझ्या कुटुंबावरती प्रेम केलं आहे, व्यक्तिगत माझ्यावर केलंय का? तर नाही. मला नाही वाटत. कारण आज मी इथे गायिका राधा मंगेशकर म्हणून बसलेय. तर एक गायिका म्हणून माझ्यावर नेहमी टीकाच झाली. मला लोकांकडून, श्रोत्यांकडून, समाजाकडून नेहमीच नकारात्मकता मिळाली. मला याची कल्पना लहानपणापासूनच आहे. मी वयाच्या ९ व्या वर्षी गायला लागले. ती पहिली एक-दोन वर्ष चांगली होती. कारण मी लहान होते. पण त्यानंतर ते आतापर्यंत (आता माझी चाळीशी उलटली आहे) टीका आणि नकारात्मकता अजुनही चालू आहे,” असं राधा मंगेशकर म्हणाल्या.

“तो सतत खोटं बोलत होता आणि…”, प्राजक्ता माळीचा ‘त्या’ रिलेशनशिपबद्दल खुलासा; म्हणाली, “त्याचे पुरावे…”

ही नकारात्मकता व टीका का आहे, असं विचारल्यावर राधा म्हणाल्या, “मुळात माझ्यावर झालेली पहिली टीका अशी आहे की माझा आवाज आत्यांसारखा नाहीये म्हणून मला पहिला नकार मिळाला. हे मी कायम सहन केलंय आणि भोगलंय. हा प्रवास माझा खूप मोठा आहे. मला फार लहान वयातच कळलं होतं की आपला समाज खूप जजमेंटल आहे. मी स्पष्ट बोलतेय की लोक खूप अपरिपक्व आहेत. माझा आवाज माझ्या आत्यासारखा कसा असू शकतो? हा प्रश्न मला लोकांना विचारायचा आहे. कारण तुमच्या मुलांचाही आवाज तुमच्यासारखा नसतो, मग माझ्या आत्यासारखा माझा आवाज कसा असेल?”

आमिर खानच्या पहिल्या पत्नीने शेअर केला त्याचा व आयरा खानचा सुंदर फोटो; रीना दत्ता म्हणाली, “मी नेहमीच…”

“मी बेसूर गाते किंवा मी बेताल आहे हे मला दाखवून द्या, जर असं असेल तर मी ते १०० टक्के मान्य करेन. मी चांगलं सादरीकरण करत नाही, अशी टीका माझ्यावर झाल्यास मी मान्य करेन. पण अशी टीका झालीच नाही. अनेकदा काही जण म्हणालेत की चांगलं नाही गायलं, आज चांगलं गायला जमलं नाही, या गोष्टी मी मान्य करते आणि सुधारण्याचा प्रयत्न करेन असं सांगते. मी रेकॉर्डिंग ऐकते. मी परफेक्ट आहे, असा दावा कधीच केलेला नाही. मी खूपच उत्तम गायिका आहे, असं मी कधीच म्हटलं नाही,” असं राधा मंगेशकर म्हणाल्या.

आमिर खानची विहीणबाईंसह कँडिड पोज, आयरा-नुपूरच्या लग्नात खान कुटुंबाचा Family Photo अन्…; पाहा खास क्षण

“८० च्या दशकातलं मी बोलत आहे, त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं. त्यामुळे लोक प्रत्यक्षात भेटून किंवा पत्र पाठवून टीका करायचे. त्यावरूनच मला कळालं की तुलना केली जात आहे. मग मी १४ ते २४ वर्षापर्यंत १० वर्षे ब्रेक घेतला. या काळात गाणं शिकणं आणि शिक्षण चालू होतं. कमबॅक केल्यानंतर आधीपेक्षा परिस्थिती जरा बरी होती, पण खूप चांगली नक्कीच नाही,” असं राधा मंगेशकर यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hridaynath mangeshkar daughter radha talks about criticism for not having voice like lata mangeshkar asha bhosle hrc