पारगाव टेकवडे…एक विचित्र आणि विक्षिप्त गाव… अशा या गावात आलीये एक ‘फटाकडी’…पारगाव टेकवडेत या ‘पोश्टर गर्ल’ने एन्ट्री घेतली आणि काकांची पंचाईत झाली…घराण्यात एकुलतं एक कन्यारत्न हे ऐकीवात होते पण अख्या गावात एकूलती एक ही वायकॉम १८ मोशन पिक्चर्सची ‘पोश्टर गर्ल’… या गावात सगळेचं बोहल्यावर चढायला एका पायावर तयार…पण ‘पोश्टर गर्ल’ला साजेसा ‘वर’ कसा शोधायचा यासाठी काकांनी आपल्या पोश्टर गर्लचं स्वयंवर करायचा निर्णय घेतला आहे. आपल्या पोश्टर गर्लसाठी तिला साजेसा ‘वर’ वरण्याच्या तयारीला तिचे काका लागलेत. त्यांनी गावातल्या तरूणांची लिस्ट शॉर्टलिस्ट करायला घेतली आहे. पोश्टर गर्लची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलणार हे जबाबदार व्यक्तीमत्त्व आहे ह्रषिकेश जोशी…’पोश्टर बॉईज्’, ‘यल्लो’, ‘आंधिळी कोशिंबीर’ अशा काही दर्जेदार सिनेमांमधून आपल्या अभिनयाची जादू मराठी मनावर करणाऱ्या या अभिनेत्याचा हा अजून एक दर्जेदार परफॉर्मन्स…
तर अशा…या ‘पोश्टर गर्ल’च्या काकांनी शॉर्टलिस्ट केलेले लग्नासाठी अनुरूप उमेदवार हळूहळू आपल्या समोर येतीलचं….पण पोश्टर गर्लच्या हातातली माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार, हे कळण्यासाठी…थोडी वाट नक्कीचं पहावी लागणार आहे.

Story img Loader