हृतिकला आपल्या ‘सुपर ३०’ या चित्रपटासाठी अखेर अभिनेत्री मिळाली असून मराठमोळी मृणाल ठाकूर हृतिकसोबत या चित्रपटात त्याच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. गेल्यावर्षी या भूमिकेसाठी त्यानं बऱ्याच ऑडिशन घेतल्या होत्या पण मनासारखी अभिनेत्री मात्र त्याला मिळत नव्हती. पण आता ‘सुपर ३०’ मध्ये मृणाल ठाकूरच मुख्य अभिनेत्रीच्या रुपात दिसणार असून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे.
‘किक २’ मध्ये जॅकलिनऐवजी अॅमी जॅक्सनची वर्णी?
गंगेच्या घाटावर या चित्रपटाचं चित्रकरण सुरू झालं असून सेटवर मृणालही हृतिकसोबत दिसत होती. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावरील चित्रपट या वर्षांत नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. पाटणा, वाराणसी आणि मुंबईत या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु आहे. मृणालचा हा बॉलिवूडमधला पहिलाच चित्रपट आहे पण छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना मात्र मृणालचा चेहरा चांगलाच परिचयाचा आहे. मृणाल अनेक हिंदी मालिकांत दिसली आहे. त्याचबरोबर ‘विटी दांडू’, ‘हॅलो नंदन’, ‘सुराज्य’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही तिनं काम केलं आहे.
…म्हणून कोट्यवधी रुपये नाकारत रणवीरने त्या कार्यक्रमास जाण्यास दिला नकार
खरं तर ‘सुलतान’ या चित्रपटात ती सलमान खान सोबत दिसणार होती. पण, नंतर मात्र या चित्रपटात मृणालऐवजी अनुष्का शर्माची वर्णी लागली आणि मृणालची बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी हुकली. पण विकास बहलच्या ‘सुपर ३०’ या चित्रपटाद्वारे मृणालसाठी आता बॉलिवूडचा मार्ग मोकळा झाला आहे.