बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या फिटनेस आणि चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. हृतिकला बॉलिवूडचा ग्रीक गॉड असंही म्हटलं जातं. मागच्या दोन दशकांपासून अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या हृतिकचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच हृतिक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. आताही काही व्हायरल फोटोंमुळे सोशल मीडियावर हृतिकच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. हॉलिवूड अभिनेत्री सामंथा लॉकवूडसोबतचे हृतिकचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.


सामंथानं तिच्या इन्स्टाग्रामवर हृतिकसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या फोटोंमध्ये दोघंही कॅमेराला पोझ देताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये हृतिक रोशन कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे तर सामंथा प्रिंटेड गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करताना सामंथानं लिहिलं, ‘अभिनयाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या या अभिनेत्याला भेटून आनंद झाला. त्याला अॅक्शनची आवड आहे. सुपरस्टार हृतिक रोशन.’

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर

मागच्या काही काळापासून सामंथा आणि हृतिक एका प्रोजेक्टवर काम करत आहेत असं बोललं जात आहे. मात्र याची कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे या माहितीत कितपत तथ्य आहे हे हृतिक आणि सामंथा यांनाच माहीत. आगामी काळात सामंथा ‘शूट द हिरो’ आणि ‘हवाई फाइव्ह ओ’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हृतिक आणि दीपिका पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या शिवाय तो ‘विक्रमवेधा’च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खानही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader