बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, हृतिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हृतिकने एका मुलीचा हात पकडला आहे. तर ती मुलगी हृतिकसोबतच त्याच्या गाडीतून जाताना दिसते.
हृतिकचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत हृतिक एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी त्याने एका मुलीचा हात पडला आहे. हृतिक तिचा हात पकडून तिला त्याच्या गाडी जवळ घेऊन जातो आणि गाडीत बसून तिला सोबत घेऊन जातो. या व्हिडीओत हृतिकने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे.
आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”
हृतिकला बऱ्याच दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी पाहिले आहे. त्यामुळे त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. दरम्यान, हृतिकचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर दुसरीकडे हृतिकच्या चाहत्याला प्रश्न पडला आहे की ‘ती मुलगी नक्की कोण आहे?’, ‘ती मुलगी हृतिकची गर्लफ्रेंड आहे का?’ असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.
आणखी वाचा : घटस्फोटानंतर प्रेग्नेंसीवर केलेल्या वक्तव्यामुळे समांथा चर्चेत
आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले
दरम्यान, हृतिक सगळ्यात शेवटी ‘वॉर’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर दिसले होते. आता तो ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत दीपिका पदूकोण दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एका चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट विक्रम वेधा या चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटात सैफ अली खानसुद्धा दिसणार आहे.