‘बँग बँग’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दुखापत झाल्याचा इतिहास असूनही हा चित्रपट आपल्या कारकीर्दीतील सर्वात सोपा चित्रपट असल्याचे अभिनेता ऋतिक रोशनचे म्हणणे आहे.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे ऋतिकच्या मेंदूवर मध्यंतरी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्याबाबत बोलत असताना तो म्हणाला की, “सर्वांनाच कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागते. समोर आव्हाने असली तरी मी त्यांना दिलखुलासपणे सामोरा जातो. जर तुमची वैचारिक भूमिका स्पष्ट असेल तर सर्वकाही सोपे असल्याची जाणीव आपोआप होते. प्रत्येकवेळी आपले सर्वोक्तृष्ट देण्याचा प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आणि ज्या दिवशी वाईट होण्याचे गृहित करणे थांबवले त्यादिवसापासून सर्वोत्तम गोष्टी घडण्यास सुरूवात झाली.” असेही ऋतिक म्हणाला.
या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी काही नव्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या यात काही शंका नाही. मी एका खोलीत स्वत:ला बंद करून माझ्या प्रत्येक चित्रपटासाठीची तयारी करत असे पण, या चित्रपटासाठी असे काहीच केलेले नाही. या चित्रपटासाठी अगदी नगण्य सराव केला असल्याने मला हा चित्रपट माझ्या करिअरमधील सर्वात सोप चित्रपट वाटतो असेही ऋतिक दिलखुलासपणे सांगितले. चित्रपटांच्या टिझरला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा आनंद आहे आणि माझ्या मुलांनाही चित्रपटाच्या टिझरमधील दृश्ये आवडली असल्याचेही तो पुढे म्हणाला.
‘बँग बँग’ हा तर माझ्या कारकीर्दीतील सर्वात सोपा अध्याय
'बँग बँग' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दुखापत झाल्याचा इतिहास असूनही हा चित्रपट आपल्या कारकीर्दीतील सर्वात सोपा चित्रपट असल्याचे अभिनेता ऋतिक रोशनचे म्हणणे आहे.
First published on: 18-09-2014 at 06:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan bang bang is the easiest film of my career