बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद काही शमण्याचे नाव घेत नाही आहे. त्यातच आता हृतिकने माझे खासगी फोटो आणि इमेल तिस-याच व्यक्तीला पाठवल्याने त्याला अटक करणे हे पोलिसांचे काम आहे असे कंगनाने म्हटलेय.
‘नोटीस मागे घे नाहीतर..’, कंगनाचा हृतिकला निर्वाणीचा इशारा
कंगना रणौतच्या वकिलांनीही मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून हृतिक रोशनला अटक करण्याची मागणी केलीयं. कंगनाने त्याच्यावर काही खाजगी मेल आणि फोटो प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवला आहे. हृतिक कंगनाला बदनाम करण्याच्या हेतूने तिने पाठवलेले खासगी मेल आणि फोटो इतरांना पाठवत आहे. याआधी हृतिकने कंगनाला नोटीस पाठवून धमकीसुद्धा दिल्याचे सांगत कंगनाचा वकील रिझवान सिद्दीकीने आयुक्तांना पत्र पाठवले.
कंगनाने मध्यंतरी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ह्रतिकचा उल्लेख ‘सिली एक्स’ असा केला होता आणि येथूनच कंगना-हृतिक च्यावादाल ठिणगी पडली. त्यावर कंगनाने आपली माफी मागावी यासाठी हृतिकने तिला नोटीस पाठविली होती.
हृतिकने माझे ‘ते’ फोटो शेअर केले, त्याला अटक करा- कंगना रणौत
कंगनाला बदनाम करण्याच्या हेतूने हृतिकने असे केल्याचा दावा.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 08-04-2016 at 09:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan circulating my photos emails alleges kangana ranaut