बॉलीवूडमध्ये जितक्या लवकर जोड्या बनतात तितक्याच लवकर त्या तुटतानाही दिसत असल्याचे चित्र आहे. नुकतीच कंगना रणौतला ‘आशिकी ३’मधून डच्चू दिल्याची बातमी आली. विशेष म्हणजे या चित्रपटात हृतिक रोशन आहे आणि त्याच्याच सांगण्यावरून कंगनाची चित्रपटातून हकालपट्टी केल्याचे कळते. त्यावर चिडलेल्या कंगनाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, हृतिकसारखे एक्स बॉयफ्रेंड असेच करतात. माझ्यासाठी तो विषय कधीच संपला आहे, असे म्हटले.
हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटाला आता वर्ष लोटले आहे. मध्यंतरी कंगना आणि हृतिकच्या रिलेशनशिपविषयी ब-याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांनीही कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नाही. पण आता कंगनाने हृतिकचा उल्लेख एक्स बॉयफ्रेंड म्हणून केल्यानंतर हे दोघे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते आणि आता त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, हृतिकने या सर्व चर्चांना उधळून लावले आहे. त्यासंबंधीचे ट्विट करताना हृतिकने म्हटले की, प्रसारमाध्यमांनी माझ्या नावासह जोडलेल्या नावाशी अफेअर करण्यापेक्षा माझ्याकडे अनेक मुलींना डेट करण्याची संधी होती.
कंगनाने हृतिकसोबत ‘क्रिश ३’मध्ये काम केले होते.

Story img Loader