बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या व्यग्र जीवनशैलीतून वेळ काढत रेहान आणि रिधान या आपल्या मुलांसह सुटी व्यतित करण्यासाठी स्वित्झर्लंड मुक्कामी गेला आहे. सध्या तो ‘मोहंजो दारो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. यातून वेळ काढत तो मुलांबरोबर सुटीचा आनंद उपभोगत असून, स्वित्झर्लंडमधील बर्फात मुलांसमवेत स्किइंग खेळाची मजा लुटतानाचा व्हिडिओ त्याने समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला आहे. हृतिक आणि त्याची मुले स्किइंग तसेच स्नो-बोर्डिंगचा आनंद लुटत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. टि्वटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओसोबत हृतिकने सर्वांना नाताळच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. ‘बँग बँग’ चित्रपटात शेवटचा दिसलेला हृतिक पुजा हेगडे या नवोदित अभिनेत्रीबरोबर ‘मोहंजो दारो’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. आशुतोष गोवारीकर यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट पुढील वर्षी २२ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader