बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सुझान खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अवघ्या काही दिवसांपूर्वी सुझानने गोव्यामध्ये एक हॉटेल सुरु केले आहे. नुकतंच तिने तिच्या चाहत्यांना हॉटेलची खास झलक दाखवली आहे.
सुझान खानने गोव्यामध्ये सुरु केलेल्या या हॉटेलचे नाव Vedro असे आहे. नुकतंच या हॉटेल सुरु झाले असून सुझानने याचा एक खास व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. सुझानने तिच्या इन्स्टाग्रामवर हे हॉटेल नेमकं कसं आहे याची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. सुझानचे हे हॉटेल पणजीमध्ये असल्याचे बोलल जात आहे.
हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानला बॉयफ्रेंडने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “डार्लिंग…”
या हॉटेलचा व्हिडीओ शेअर करताना सुझान म्हणाली, तुम्ही आता जे काही पाहात आहात, ते नक्कीच सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. आम्हाला आमच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. vedro…, असे तिने म्हटले आहे. या व्हिडीओत सुझान हे स्वत: विविध ठिकाणी लक्ष देत असल्याचे दिसत आहे. ती विविध लॅम्प, फोटोफ्रेमची मांडणी करत हॉटेलचा प्रत्येक कोपरा सजवताना दिसत आहे.
सुझानने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या नव्या हॉटेलच्या निमित्ताने अनेकजण तिला शुभेच्छा देताना दिसत आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला आणि तिच्या हॉटेलला खूप खूप शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
सुझान खानने गोव्यामध्ये हॉटेल सुरु केल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन केले होते. या सुझान खान, तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणी, हृतिक रोशन आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादही सहभागी झाले होते. यासोबत त्यांचे इतर मित्रही यावेळी पार्टीत सहभागी झाले होते.