अभिनेता हृतिक रोशन मागच्या काही दिवसांपासून असं काही ना काही करताना दिसत आहे. ज्यामुळे त्याच्या आणि सबा आझादच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण येतं. कधी दोघंही लंच किंवा डिनरला जाताना दिसतात तर कधी एकमेकांच्या कुटुंबीयांसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात. याशिवाय दोघंही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटो किंवा व्हिडीओवर कमेंट करताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलंय. सबा आणि हृतिक त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेषतः हृतिकनं सबाच्या पोस्टवर केलेली कमेंट सध्या खूप चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सबा आझाद तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती सत्यजीत रेच्या क्लासिक चित्रपट ‘गूपी जाने बाघा बायने’चं एक बंगाली गाणं गुनगुनताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने सबानं म्हटलंय की, बालपणी ती या अल्बममधील प्रत्येक गाणं शिकली होती. पण त्यावेळी तिला ही भाषा अजिबात समजत नव्हती.

आणखी वाचा- नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड

व्हिडीओ शेअर करताना सबानं त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘घरी आजारी असताना गाण्याव्यतिरिक्त आणखी काही करण्याची ताकद माझ्यात नाहीये. जेव्हा मी लहान होते त्यावेळी माझ्या आई- वडिलांनी मला क्लासिक चित्रपट ‘गोपी जाने बाघा बायने’च्या साउंडट्रॅकची एक कॅसेट टेप दिली होती. त्यानंतर काही दिवसांनीच मी हा चित्रपट एका फेस्टिवलमध्ये पाहिला. त्यावेळी मला बंगाली भाषा अजिबात समजत नव्हती. पण तरीही काही दिवसांतच हा चित्रपट माझा आवडता चित्रपट झाला आणि मी त्याचं प्रत्येक गाणं शिकले.’

आणखी वाचा- “लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने…”, भाग्यश्रीच्या पतीनं शेअर केलं ‘ते’ सीक्रेट

सबाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना हृतिक रोशननं लिहिलं, ‘तू एक असामान्य व्यक्ती आहेस.’ हृतिकच्या या कमेंटला सबानं उत्तर दिलं आहे. तिने लिहिलं, ‘आणि तू सर्वात दयाळू व्यक्ती आहेस..’ हृतिक आणि सबा यांच्या या कमेंट्सनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा या दोघांच्या लिंकअपच्या चर्चांना उधाण आहे. दरम्यान याआधीही हृतिकनं सबासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी आजारी असलेल्या सबासाठी हृतिकच्या कुटुंबीयांनी जेवण पाठवलं होतं. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत त्यांचे आभार मानले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan flirty comment on rumored girlfriend saba azad video goes viral mrj