बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. हृतिकच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्याची सध्या सर्वाधिक चर्चा होताना दिसतेय. हृतिक रोशन मागच्या काही काळापासून अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. एवढंच नाही तर दोघंही एकमेकांच्या सोशल मीडियावरही सातत्यानं कमेंट करताना दिसतात. अशात आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय. हृतिकच्या एका जवळच्या मित्रानं या दोघांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.
हृतिक आणि सबा यांच्या एका जवळच्या मित्रानं ‘इंडिया टुडे’शी बोलताना या दोघांच्या बॉन्डिंग आणि लग्नाबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला, ‘दोघंही एकमेकांना पसंत करतात. एवढंच नाही तर हृतिकच्या कुटुंबीयांनाही सबा खूप आवडली आहे. विशेषतः तिचं म्युझिक सर्वांना आवडलं. जेव्हा अलिकडेच सबा त्याच्या घरी गेली होती त्यावेळी त्यांनी एक छोटंसं म्युझिक सेशन ठेवलं होतं. सर्वांनी ते खूप एन्जॉय केलं. पण लग्नाच्या बाबतीत बोलायचं तर दोघांनाही यासाठी वेळ हवा आहे. त्यांना कोणताही निर्णय घ्यायची घाई करायची नाहीये.’
आणखी वाचा- ‘झुंड’ पाहिल्यावर आमिरला अश्रू अनावर; अमिताभ बच्चन म्हणतात “तो नेहमीच अति…”
हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर सातत्यानं सुरू असली तरीही या दोघांनी मात्र या नात्याची जाहीर कबुली अद्याप दिलेली नाही. मात्र सबा आणि हृतिकच्या कुटुंबीयांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच सबा आजारी असताना हृतिकचे कुटुंबीय तिची काळजी घेताना दिसले होते.
आणखी वाचा- आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ १०० कोटींच्या क्बबमध्ये दाखल! चित्रपटानं केला नवा विक्रम
दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार हृतिक रोशन आणि सबा आझाद त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते. पहिल्या भेटीनंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. पण काही दिवसांपूर्वीच डिनर डेटनंतर एकत्र स्पॉट झाल्यानं ही गोष्ट पहिल्यांदाच समोर आली. हृतिकच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच तो अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहे.