बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आहे ते त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे. मागच्या काही दिवसांपासून हृतिक रोशन अभिनेत्री आणि गायिका सबा आझादला डेट करत असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. बऱ्याचदा या दोघांनाही लंच किंवा डिनरला जाताना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाचं चांगलं बॉन्डिंग आहे. त्यामुळे हे दोघंही लवकरच लग्न करणार अशी चर्चा देखील होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृतिक रोशन सबा आझादला डेट करत असला तरीही त्याचं एक्स वाइफ सुझान खानसोबत खूप चांगलं बॉन्डिंग आजही आहे. मुलांसाठी दोघंही अनेकदा एकत्र टाइम स्पेंड करताना दिसतात. एवढंच नाही तर आता सबा आझाद आणि सुझान खान यांच्यातही खूप चांगलं बॉन्डिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघीही एकमेकींच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. नुकत्याच एका पोस्टमध्ये सबा आझाद सुझानला एका खास नावानं हाक मारत असल्याचा खुलासा झाला आहे.

आणखी वाचा- The Kashmir Files प्रमोशन वादावर कपिल शर्माचं स्पष्टीकरण; म्हणाला “त्यांनी केलेले आरोप…”

सबानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक स्क्रिन टेस्टचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, ‘मला स्क्रिन टेस्ट करणं आवडतं. पण मला माहीत नाही लोकांना हे करणं का आवडत नाही. मला वाटतं हे तुम्ही स्वतःच तुमच्या कलेची परीक्षा घेण्यासारखं आहे. ही एक मजेदार पद्धत आहे. तुम्ही रोज वेगवेगळ्या भूमिका जगता आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करता यापेक्षा उत्तम काय असू शकतं.’

आणखी वाचा- “करणवीर बोहरानं मला रिलेशनची ऑफर दिली पण…” Lock Upp च्या महिला स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा

सबाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना सुझान खाननं लिहिलं, ‘खुपच सुंदर, मला आवडलं.’ सुझानच्या या कमेंटला रिप्लाय करताना सबानं लिहिलं, ‘धन्यवाद सूझ…’ सबाच्या या कमेंटमध्येच ती सुझानला ‘सूझ’ या खास नावानं हाक मारत असल्याचा खुलासा झाला आहे.

दरम्यान हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘फायटर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. याशिवाय त्याच्याकडे ‘विक्रम वेधा’चा हिंदी रिमेक आहे. ज्यात सैफ अली खानही मुख्य भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan grilfriend saba azad gave sweet name to his ex wife sussane khan mrj