अंधेरी परिसरातील लोटस इमारतीला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेले अग्निशमन जवान नितीन इवलेकरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आणि मित्रांना आवाहन केले आहे. सुरुवातीला स्वतहून या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची दक्षता त्याने घेतली आहे. लोटस इमारतीतील जे तीन मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते ते स्वत: ह्रतिकच्या मालकीचे आहेत. फराह खानसह बॉलिवूडच्या अन्य मंडळींनीही परिवाराला मदतीचा हात देऊ केला आहे.  

Story img Loader