बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमुळे सातत्याने चर्चेत आहे. हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद यांचे अफेअर सुरु असल्याचेही बोललं जात आहे. अनेकदा ते दोघेही एकत्र फिरताना, डिनर डेटवर जातानाही दिसले होते. काही दिवसांपूर्वीच सबा ही हृतिकच्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाही दिसली होती. त्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अद्याप त्या दोघांनीही याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. पण नुकतंच हृतिक आणि सबा आझादच्या एका कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

नुकतंच हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते दोघेही मुंबई विमानतळाबाहेर असल्याचे दिसत आहे. यावेळी हृतिक आणि सबा दोघेही हातात हात घालून चालताना दिसले. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. विशेष म्हणजे यावेळी सबा चक्क लाजताना पाहायला मिळत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सबा आणि हृतिकचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Premachi Goshta
Video : सई दूर गेल्याने मुक्ता संतापली, सागरच्या थेट कानशि‍लात लगावली; पाहा मालिकेचा नवा प्रोमो
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
myra vaikul emotional
Video : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला मायरा वायकुळ झाली भावुक; रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
Shocking video of lion started chasing buffaloes herd for hunt see what happened next thrilling hunting video went viral
VIDEO: “शिकार करो या शिकार बनो” सिंहाची चलाख चाल अन् म्हशीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

पत्रकाराला धमकी; सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी हृतिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी हृतिक रोशनच्या जुन्या अफेअर्सबाबत कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे. ‘लहान मुलीला घेऊन फिरत आहे’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर केली आहे. तर एकाने ‘हिच्यापेक्षा कंगना बरी होती’, अशीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘खूप वाईट निवड’, असेही एकाने कमेंट करत म्हटले आहे.

‘मुलगी झाली हो’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण आले समोर

दरम्यान काही दिवसांपासून ते दोघेही सातत्याने चर्चेत आहे. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचेही बोललं जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सबाला हृतिक रोशनसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने काहीही उत्तर दिले नाही. ई- टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाबाबत सबा आझाद यांच्याशी संपर्क साधला असता तिने त्यांचा प्रश्न ऐकला. पण तिने त्यावर फार मोजक्या शब्दात उत्तर देत फोन डिस्कनेक्ट केला होता. मात्र आता ते दोघेही हातात हात घालून फिरताना दिसत असल्याचे चांगलेच चर्चेत आहेत.

सबा आझाद नेमकी कोण?

सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती राहुल बोससोबत झळकली होती. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. सबाला गायनासोबतच थिएटरचीही प्रचंड आवड आहे. तिने अभिनेता नसरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत ‘मॅडबॉय/मिंक’ या इलेक्ट्रॉनिक बँडचीही सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच ती ‘सोनी लिव्ह’वरील ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरीजमध्ये झळकली होती.

Story img Loader