अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुझान खान यांचे नाते संपुष्टात येऊन आता काही काळ लोटला आहे. मात्र, या वैयक्तिक वादामुळे ह्रतिक रोशन आणि त्याच्या मुलांच्या नात्यात कोणताही फरक पडलेला नाही. ह्रतिक रोशन सध्या आपल्या रेहान आणि रिदान या दोन्ही मुलांसोबत डिस्नेलँडमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. एखाद्या रस्त्यावरून चालताना तुम्ही जरूर थांबलेच पाहिजे आणि एखादे छायाचित्र तरी काढले पाहिजे अशाप्रकारचे ट्विट ह्रतिकने केले. तसेच डिस्नेलँडमध्ये मुलांसोबत धमाल करत असतानाचे काही फोटो ह्रतिकने ट्विटरवर अपलोड केले आहेत. काही दिवसांपूर्वी ह्रतिक मोठ्या आजारपणातून बाहेर पडला होता. त्यानंतर लगेचच पत्नी सुझानशी असलेले त्याचे १७ वर्षांचे नातेसुद्धा संपुष्टार आले होते. या कटू अनुभवांनंतर ह्रतिक ‘बँग बँग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात गेले अनेक दिवस व्यग्र होता. मात्र, या सुट्टीच्या निमित्ताने ह्रतिकला आपल्या मुलांसह काही आनंदाचे क्षण जगण्याची संधी मिळाली आहे.  

Story img Loader