बॉलीवूडमध्ये सर्वात चांगली शरीरयष्टी असलेला अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. मात्र, ही शरीरयष्टी त्याने कशी कमावली आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना. तर त्याबाबतच्या टिप्स त्याने स्वतःच दिल्या आहेत.
उत्तम शरीरयष्टीकरिता मानसिक शांतता, शिस्त आणि अध्यात्मिक दृष्टी जास्त महत्त्वाची आहे. ना की, जड वजन उचलण्याची गरज आहे, असे हृतिकने ट्विट केलेयं.  आगामी ‘बँग बँग’ चित्रपटात हृतिकची उत्तम शरीरयष्टी आणि कोणतेही कठीण स्टंट करण्याची कसब आपल्याला जास्तीत जास्त पाहावयास मिळणार आहे. पण, सध्या वैयक्तिक आयुष्यात तो सुझानने मागितलेल्या ४०० कोटींच्या पोटगीच्या अफवांना उत्तर देण्यात व्यस्त झाला आहे.

Story img Loader