अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. सुझानच्या फोटोवर हृतिकने कमेंट केली असून त्याची कमेंट वाचून हे दोघं पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील या फोटोमध्ये सुझान अत्यंत सुंदर दिसतेय. ‘मला सर्वोत्तम संधी, सर्वोत्तम मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि सर्वोत्तम व्यक्ती माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल आयुष्य तुझे खूप खूप आभार’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत हृतिकने लिहिलं, ‘लव्ह इट’. त्यासोबत १०० ही इमोजी त्याने पोस्ट केली.
आणखी वाचा : KBC मधून कोट्यवधी रुपये जिंकलेले विजेते सध्या काय करतात?
हृतिक आणि सुझानने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांमधील मैत्री कायम चर्चेत राहिली. लॉकडाउनदरम्यान सुझान हृतिकच्या घरी राहायला आली होती. आपल्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुझानने सांगितलं आणि तिच्या या निर्णयाचं हृतिकने मनापासून स्वागत केलं.