‘बँग बँग’ चित्रपटातील ‘तू मेरी’ आणि ‘मेहेरबान’ या दोन गाण्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर चित्रपटकर्ते चित्रपटातील तिसऱ्या गाण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे या चित्रपटाचे शीर्षक गीतदेखील आहे. या गाण्याचे टिझर प्रसिद्ध करण्यात आले असून, टिझरमध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफची जोडी एकदम हॉट दिसते. नेहमीप्रमाणेच हृतिकची डान्सिंग मूव्ह एकदम झकास झाली असून, कतरिनासुद्धा कुठेही कमी पडलेली नाही. या गाण्याचे बोल विशाल ददलानी याचे आहेत. २ ऑक्टोबरला ‘बँग बँग’ चित्रपटगृहात दाखल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा