सुप्रसिद्ध सुत्रसंचालक आणि बॉलीवूड अभिनेता मनिष पॉल याच्या पीळदार शरीरयष्टीचे अभिनेता ह्रतिक रोशन याने कौतुक केले. एका मासिकात छापून आलेली आपली मूलाखत आणि छायाचित्र मनिष पॉल याने ट्विट केले होते. छायाचित्रात मनिषच्या शरीरयष्टीत झालेला बदल पाहायला मिळतो. मनिषने आपल्या ट्विटमध्ये ह्रतिकचे आभार मानले आहेत. ह्रतिक हाच माझ्या पीळदार शरीरयष्टीचा आदर्श आहे. त्यामुळेच हे सारं होऊ शकलं, असे म्हणत मनिषने ह्रतिकचे आभार मानले. यावर ह्रतिकने मनिषमधील बदल पाहून आश्चर्यचकीत झाल्याचे म्हटले. यालाच बदल म्हणतात, मनिषच्या शरीरयष्टीतील बदल प्रेरणादायी आहे, असे ह्रतिकने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा