अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी सुझान खान घटस्फोटानंतरही चांगले मित्र आहे. अनेकदा ते एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. नुकताच सुझाननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सुझान खान वर्कआटउट करताना दिसत आहे. हृतिक रोशननं या व्हिडीओवरून सुझानची खिल्ली उडवली आहे.
सुझाननं तिच्या इन्स्टाग्रामवर वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती डंबल्स उचलताना दिसत आहे. वर्कआउट करताना तिने टॅन्क टॉप आणि बास्केटबॉल शॉर्ट्स घातल्या आहे. तिच्या या प्रिटेंड शॉर्ट्स पाहून हृतिकला हसू अनावर झालं. तिच्या व्हिडीओवर कमेंट करताना हृतिकनं लिहिलं, ‘हाहाहा… मला या शॉर्ट्स आवडल्या.’ तसं पाहायला गेलं तर अशाप्रकारची कमेंट करण्याची हृतिकची ही पहिलीच वेळ नाही. त्यानं याआधी कुणाल कपूरच्या वाढदिवशी त्याच्या शॉर्ट्सवरून कमेंट करत त्याची खिल्ली उडवली होती.
हृतिक रोशन नेहमीच सुझानच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच सुझाननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फिटनेस व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर ‘वेल डन’ अशी कमेंट करत हृतिक तिला प्रोत्साहन देताना दिसला होता. हृतिक रोशन आणि सुझाननं घटस्फोट घेतला असला तरीही ते एकमेकांचे चांगले मित्र असून कठीण काळात एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात.
दरम्यान मागच्या काही दिवसांपासून हृतिक रोशनचं नाव अभिनेत्री सबा आझादशी जोडलं जात आहे. काही वेळा या दोघांना डिनर डेटनंतर एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. तर दुसरीकडे सुझान खान देखील तिच्या आयुष्यात पुढे गेली असून सध्या ती अर्सलान गोनीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.