मागच्या काही दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादमुळे चर्चेत आहे. दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर सातत्यानं होताना दिसते. दोघंही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. अशात आता हृतिकची आई पिंकी रोशन यांनी सबा आझादच्या फोटोवर कमेंट केली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

अलिकडेच सबा आझादनं Audrey Hepburn च्या थीमवर एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सबा काळ्या रंगाचा टॉप आणि लेदर स्कर्टमध्ये पोझ देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिलं, ‘मी बरीच जुनी मासिकं पाहिली, ज्यातून मी हेपबर्न यांना कॉपी करण्याचा प्रयत्न केला. हे खूप व्हायरल होत आहे. खूप मजा आली.’

आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रींना काश्मिरी पंडितांची काळजी असेल तर…”, ‘द कश्मीर फाइल्स’वर करणी सेनेचं विधान चर्चेत

सबाच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी कमेंट केली आहे. त्यांनी आपल्या कमेंटमध्ये सबाचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘हा फोटो खूपच क्यूट आहे आणि हेपबर्नशी फारच मिळता- जुळता आहे.’ पिंकी यांच्या या कमेंटवर सबानं देखील रिप्लाय दिला आहे. तिनं लिहिलं, ‘धन्यवाद पिंकी आंटी’ याशिवाय इतरही अनेक कलाकारांनी सबाच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- “…अन् तिथेच सर्व बिघडलं” ब्रेकअप आणि डिप्रेशनवर पहिल्यांदाच बोलला प्रतीक बब्बर

दरम्यान हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दीपिका आणि हृतिक मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. तर सबा आझाद अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकेट बॉइज’ वेब सीरिजमध्ये दिसली होती.

Story img Loader