काही महिन्यांपूर्वीच हृतिकच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आता ‘क्रीश ३’नंतर ह्रतिकच्या डोकेदुखीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ह्रतिकच्या आगामी ‘शुद्धी’ आणि ‘बँग बँग’चे चित्रीकरण तब्बल सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हृतिक म्हणाला की, सर्व लोकांनी क्रिश ३ ला जे प्रेम दिले आहे त्यामुळे मी खूप खूश आहे. जानेवारी २०१४ला ‘बँग बँग’ आणि त्यानंतर ‘शुद्धि’च्या चित्रीकरणास सुरुवात करण्यापूर्वी मी काही दिवसांची सुट्टी घेणार आहे. जेणेकरून, गेल्या काही आठवड्यांपासून होत असलेल्या डोकेदुखीपासून मला आराम मिळेल. मला विश्वास आहे की, तुमच्या प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी पूर्णपणे बरा होईन. मी प्रार्थना करेन की, तुम्हा सर्वांना २०१३चा शेवट आणि २०१४ची सुरुवात खूप चांगली होवो.
हृतिक ‘बँग बँग’मध्ये कतरिना तर ‘शुद्धि’मध्ये करीना कपूरसोबत दिसणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा