बॉ़लीवूडचा सुपरहिरो हृतिकसाठी २०१३ हे वर्ष ‘क्रिश ३’ सोडता जरा वाईटच होते. त्याच्या मेंदूवर झालेली शस्त्रक्रिया त्यानंतर पत्नी सुझानसोबतचा घटस्फोट हे सारेच त्रासदायक होते. मात्र, या सगळ्यात ‘बँग बँग’ चित्रपटाचे शूटींग रखडले. पण आता हृतिक सदर चित्रपटाच्या चित्रीकरणाकरिता सज्ज झाला असून, त्याने कामास सुरुवात केली आहे.
तो शूटींगसाठी नुकताच शिमला येथे गेला आहे. हृतिकवर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे चित्रीकरणाचे काम पुढे ढकलण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृतिक आणि कतरिनाने दिग्दर्शकाला जास्तीत जास्त तारखा दिल्या असून, सलग सहा आठवडे चित्रीकरणाचे काम सुरु राहणार आहे. या चित्रपटानंतर तो लगेचच करण जोहरच्या ‘शुद्धी’ चित्रपटाच्या शूटींगसाठी वेळ देणार आहे.
हृतिकसाठी २०१३ हे वर्ष यशस्वी राहिले. त्याचा ‘क्रिश ३’ हा चित्रपट आमिरच्या ‘धूम ३’ नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’लाही तिकीट बारीवर मागे सारले. पण, याच वर्षी त्याचे १७ वर्षे चालले नाते तुटले आणि त्याने सुझानपासून घटस्फोट घेतला.

Story img Loader