बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक रोशन हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. हृतिक रोशन हा सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद दोघेही हातात हात घालून फिरताना दिसले होते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र याबाबत दोघांनीही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यानंतर आता सबाने हृतिकच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर हृतिक आणि सबाचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये फक्त हृतिक आणि सबासोबत संपूर्ण रोशन कुटुंब दिसत आहे. हा फोटो २० फेब्रुवारीचा असल्याचे बोललं जात आहे. यात सबा ही हृतिकच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे. सबा ही हृतिकच्या कुटुंबांसोबत रविवारी जेवणासाठी भेटली होती.
हृतिकचे काका राजेश रोशन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “आनंद हा आपल्या आजूबाजूला असतो. विशेषत: जेव्हा रविवारी जेवणाची वेळ असते”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. राजेश रोशन यांच्या या पोस्टवर सबा आणि हृतिक या दोघांनीही कमेंट केली आहे.
या पोस्टवर कमेंट करताना हृतिक म्हणाला, ‘हो…, अगदी बरोबर काका आणि तुमच्यासोबत खूप मजा आली’. तर सबाने ‘सर्वात उत्तम रविवार’ अशी या पोस्टवर कमेंट केली आहे. दरम्यान त्यांच्या या फोटोनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच सबाचे हृतिकच्या कुटुंबासोबत फार छान बॉन्डिंग असल्याचेही याद्वारे दिसत आहे.
“खलनायक असलो तरीही…”, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील अभिनेता झाला भावूक
सबा ही नुकतंच रॉकेट बॉईज या वेब सीरिजमध्ये झळकली होती. तर हृतिक रोशन हा सध्या त्याचा आगामी विक्रम वेधा आणि फायटर या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचे दिसत आहे.