हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहत प्रेक्षक ‘विक्रम वेधा’च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. हृतिक-सैफची जुगलबंदी या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या चित्रपटाबाबत नेहमीच नव्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. आता ‘विक्रम वेधा’बाबत एक नवी माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा – Video : जाहिरातीमधील ‘ती’ तीन सेकंद अन् रातोरात प्रसिद्ध झाली होती ऐश्वर्या राय, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
याआधी ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ हा ट्रेंड ट्वीटरवर चर्चेचा विषय ठरला होता. पण आता ‘विक्रम वेधा’ यावर्षीचा बॉलिवूडमधील सगळ्यात महत्त्वपूर्ण चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. सुप्रसिद्ध चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्वीटद्वारे ते म्हणाले, “जगभरातील एकूण १०० देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित होणार आहे.” म्हणजेच हा चित्रपट सहज १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच युरोपमधील २२ शहरं आणि आफ्रिका देशामधील २७ शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच जपान, रूसमधील प्रेक्षकांनाही ‘विक्रम वेधा’ तेथील चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच ‘विक्रम वेधा’ची भव्यदिव्यता लक्षात येते. प्रेक्षकांनाही या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
आणखी वाचा – “अजूनही खूप लोकांना माहीत नाही की…” पंकज त्रिपाठींनी सिद्धार्थ शुक्लाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत
हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’चा रिमेक आहे. सैफ यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर हृतिक एकदम डॅशिंग अंदाजामध्ये पाहायला मिळेल. राधिका आपटे सैफच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.