हृतिक रोशन, सैफ अली खान यांचा बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोन्ही अभिनेते मेहनत घेते आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट मुळ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. मुळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती यांच्यातली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली तर या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या या २ अभिनेत्यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. प्रेक्षकदेखील हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्येच चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता माध्यमांच्या वृत्तानुसार ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहेत. आतापर्यंत १००८ तिकिटं विकली गेली आहेत असं बोललं जात आहे. चित्रपटाने आतापर्यंत ८.७८ लाखांची कमाई केली आहे. येणाऱ्या काही दिवसात हे आकडे वाढू शकतात असंही म्हंटल जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती मिळाली होती. विक्रम वेधा’च्या ट्रेलरची सुरुवात हृतिक रोशनपासून होते. यानंतर सैफ अली खानची एक झलक पाहायला मिळत आहे. तसेच एक उत्तम पार्श्वसंगीत सुरु आहे, जे लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यानंतर हृतिक एका फाईट सीनमध्ये अ‍ॅक्शन करताना दिसत आहे, तर दुसरीकडे सैफ अली खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याच्या सहकार्यांच्या बरोबरीने तो गुंडांशी सामना करताना दिसत आहे. राधिका आपटे या चित्रपटात सैफच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आता हॉलिवूडमधून पाठिंबा!! ‘या’ अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मुळ चित्रपट लोकांनी भरपूर पसंत केला होता. या रिमेकच्या बाबतीतही बरीच लोकं उत्सुक दिसत आहेत. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा लूकसुद्धा लोकांना प्रचंड आवडला आहे. ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे. विक्रम वेधादेखील बॉक्स ऑफिसवर चालेल अशी अपेक्षा चित्रपटाची आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan saif ali khans vikram vedha first day advance booking started spg