बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनने सिनेसृष्टीत सुपरहिरोच्या भूमिका साकारल्या आहेत पण, या चित्रपटसुपरहिरोने त्याची बहीण सुनैना ही माझ्यापेक्षा मोठी सुपरहिरो असल्याचे म्हटले आहे. रक्षाबंधन निमित्त आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हृतिकने म्हटले की, चित्रपटसृष्टीत मी असल्याने माझ्याकडे अनेक चाहते आहेत. त्यांच्यामुळे मला महत्व प्राप्त झाले. पण, ज्यांच्याकडे असे चाहते नसूनसुद्धा त्या व्यक्ती महत्वपूर्ण असतात ते खरे सुपरहिरो असतात त्यामुळे माझी बहिण माझ्यापेक्षा मोठी आहे कारण, तीची प्रशंसा करण्यासाठी तीला चाहत्यांची गरज भासत नाही. तिने कर्करोगासारख्या अनेक संकटांना सामोरे गेली आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा सुनैनाच खरी सुपरहिरो आहे असेही हृतिक अभिमानाने म्हणाला.
हृतिक सुनैनापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. परंतु, सुनैनाच्या म्हणण्यानुसार लहानपणापासूनच हृतिक नेहमी मोठ्या भावासारखा जबाबदारी पूर्वक वागतो आणि आजही तो तसाच आहे. त्यात काही बदल झालेला नाही. 

Story img Loader