अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेला आहे. ‘विक्रम वेधा’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाच्या ‘पुष्कर-गायत्री’ या दिग्दर्शक जोडीने तेच नाव वापरुन चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवायचे असे ठरवले. त्यांनी या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खानला कास्ट केले. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. या पोस्टरच्या माध्यमातून हृतिक आणि सैफ दोघांचा चित्रपटातील लूक समोर आला. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या पोस्टरमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.

‘विक्रम वेधा’च्या पोस्टर्सनंतर चित्रपटाचा काही सेकंदांचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. टीझरवरुन ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट एक थरारपट असल्याचे कळते. तसेच सैफ अली खान पोलिसाच्या, तर हृतिक रोशन कुख्यात गुंडाच्या भूमिकेत असल्याचे समजते. चोर-पोलिसांच्या या कहाणीचा अप्रत्यक्ष संबंध विक्रम आणि वेताळाच्या गोष्टीशी लावण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादाला पाहून अभिनेता हृतिक रोशन गहिवरुन गेला आहे. हृतिक सोशल मीडियावर सक्रीय आहे. तो या माध्यमाचा वापर करुन चाहत्यांशी संपर्क साधत असतो.
आणखी वाचा- कधी शरीरसंबंधांची मागणी तर कधी मसाज; राधिका आपटेने सांगितला होता बॉलिवूडचा धक्कादायक अनुभव

हृतिकने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने टीझरला दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. त्याव्यतिरिक्त हृतिकने त्याच्या या आगामी चित्रपटाशी निगडीत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर ८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादामुळे निर्मात्यांनी काही खास चाहत्यांसाठी चित्रपटाच्या ट्रेलरचा प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित केला आहे.

ट्रेलरच्या प्री-रिलीज प्रिमियरच्या टिकीटांसाठी चाहत्यांनी दोन्ही हातांच्या बोटांनी इंग्रजीमधील ‘व्ही’ अक्षराची खूण करत फोटो काढायचे आहेत आणि चित्रपटाच्या टीमला पाठवायचे आहेत. निवडक चाहत्यांना ‘विक्रम वेधा’च्या टीमसोबत टीझर पाहायला मिळणार आहे. ‘व्ही’ ही विक्रम वेधाच्या चित्रपटाची स्पेशल खूण असल्याचेही हृतिकने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

आणखी वाचा- हृतिक रोशनला बॉयकॉटची भीती ? चाहत्याच्या पडला पाया

‘वॉर’ या चित्रपटानंतर तब्बल तीन वर्षानंतर हृतिक ऑनस्क्रीन दिसणार आहे. विक्रम वेधा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तमिळ ‘विक्रम वेधा’मध्ये आर. माधवन आणि विजय सेतुपती यांनी काम केले होते.

Story img Loader