रुपेरी पडद्यापासून बरेच दिवस लांब असलेला हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हृतिक रोशन अभिनेत्री आणि मॉडेल सबा आझादला डेट करत असल्याचे बोललं जातं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मात्र आता एका नव्या विषयावरून हृतिक चर्चेत आला आहे. हृतिकने नुकतंच स्वतःचा एक शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे. यात तो बीचवर धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या पोस्टवर सबा आझादनेही कमेंट केली आहे.
हृतिक रोशन हा सध्या त्याच्या आगामी फायटर या चित्रपटाची तयारी करताना दिसत आहे. या तयारी दरम्यानचा एक फोटो हृतिकने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो बीचवर शर्टलेस धावताना दिसत आहे.
आणखी वाचा – खरंच दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय हृतिक रोशन? वाचा नेमकं काय आहे सत्य
‘क्रिस गेथीन तयार आहेस का? मी तरी नाही. आपल्याला फायटर वृत्ती परत मिळवायची आहे.’ असे कॅप्शन हृतिकने या फोटोला दिले आहे. तर गर्लफ्रेंड सबानेदेखील यावर कंमेट करत त्याला प्रोत्साहन दिले आहे. ‘तू खंबीर आहेस, जन्मापासूनच…, तू यासाठी तयार आहेस, गो निन्जा’ अशी कंमेट सबा आझादने केली आहे. तर हृतिकच्या चाहत्यांनी त्याच्या या मेहनतीची प्रशंसा केली आहे.
आणखी वाचा – फोटो सबा आझादचा पण चर्चा होते हृतिक रोशनची, पाहा फोटो
ह्रतिक रोशनचा ‘फायटर’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. ही भारतातली पहिली एरिअल अॅक्शन फिल्म आहे. सिद्धार्थ आनंद हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाची हृतिकचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.