अभिनेता ह्रतिक रोशन याने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. हे छायाचित्र ह्रतिकच्या बालपणीचे असून यामध्ये तो  एका चित्रपटाच्या सेटवर अमिताभ यांच्यासोबत दिसत आहे. मी लहानपणी अमिताभ यांच्या खूप मोठा चाहता असल्याची आठवण ह्रतिकने छायाचित्रासोबतच्या संदेशात सांगितली आहे.


ह्रतिकने अमिताभ यांच्याबरोबर ‘कभी खुशी कभी गम’आणि ‘लक्ष्य या चित्रपटांत एकत्र काम केले होते. याशिवाय, ह्रतिकने नुकतेच आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. लवकरच तो ‘काबिल’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.

Story img Loader