अभिनेता ह्रतिक रोशनने रविवारी त्याच्या मुलांसोबत चक्क रिक्षातून प्रवास केला. रिहान आणि रिधान या आपल्या मुलांसोबत रिक्षातून प्रवास करतानाचे छायाचित्र ह्रतिकने ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. सुरूवातीला ह्रतिक मुलांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता आणि तिथून हे तिघेहीजण रिक्षाने घरी परतले. एरवीही ह्रतिक आपल्या लहानग्यांबरोबरचे आनंदी क्षण सोशल मिडीयावर प्रसिद्ध करत असतो. काही दिवसांपूर्वीच रिहान आणि रिधान यांच्यासह ह्रतिक स्वित्झर्लंडला गेला होता. सध्या तो ‘मोहंजो दारो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. मात्र, इतक्या व्यग्र जीवनशैलीतूनही त्याने रिहान आणि रिधानसाठी वेळ काढला होता. ‘बँग बँग’ चित्रपटात शेवटचा दिसलेला हृतिक हा पुजा हेगडे या नवोदित अभिनेत्रीबरोबर ‘मोहंजो दारो’ या आगामी चित्रपटात दिसेल. आशुतोष गोवारीकर यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट पुढील वर्षी २२ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader