बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेता हृतिक रोशनने हृदान आणि हृहान या आपल्या मुलांसोबतचे एक सुंदर छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. सदर छायाचित्रात तिघांनीही जांभळ्या रंगाचा सूट, काळे शर्ट आणि एकसारखेच शूज परिधान केले आहेत. हे तिनही रोशन सूटमध्ये खरचं रुबाबदार आणि देखणे दिसत होते.
हृतिकने हे छायाचित्र ट्विट केले असून त्यावर लिहले की, “माझी मुले माझ्यासाठी प्रेरणा आहेत.”

कलर्स वाहिनीच्या एका पुरस्कार सोहळ्याला हृतिकने आपल्या मुलांसह उपस्थिती लावली होती. यावेळी त्याचा ‘ब्रॅण्ड व्हिजनरी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सत्कार करण्यात आला.

Story img Loader